Welcome to गोंदिया साधना न्यूज़   Click to listen highlighted text! Welcome to गोंदिया साधना न्यूज़
देश

अजित पवार यांचा घातपात, योग्य वेळी मी याबाबत बोलणार, उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य, विलिनीकरणाच्या चर्चांवरही बोलले

अजित पवारांचा घातपात आहे असं मला वाटतं. एक दिवस याबाबत मी बोलणार असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलं आहे.

Umesh Patil : अजित पवारांचा घातपात आहे असं मला वाटतं. एक दिवस याबाबत मी बोलणार असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil )यांनी केलं आहे. माझ्याकडे याबाबत पुरावा नाही पण मला अजित पवार यांचा घातपात असल्याचे वाटत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्याबाबतचे पुरावे त्यांनी द्यावेत. हवेत त्यांनी बोलू नये असेही पाटील म्हणाले. ते आज बारमातीत आले होते. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेली ते बोलत होते.

विलीनीकरणाची चर्चा आगामी काळात होईल का नाही हे माहीत नाही

विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असेही उमेश पाटील यावेळी म्हणाले. या चर्चा फक्त मिडियात आहेत. सुनील तटकरे हे जे बोलले आधी वेगळे बोलले आता वेगळे बोलले म्हणजे त्यांचं म्हणणं न्यूट्रल झालं आहे. मी जबाबदारीने सांगतो विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरु नाही असे पाटील म्हणाले. जर शरद पवारांच्या पक्षाला एनडीएमध्ये यायचं असेल तर भाजपने त्यांना घ्यायचं का नाही ठरवावे यामध्ये राष्ट्रवादीचे काय भूमिका असे पाटील म्हणाले. आमच्या गटाचे आमदार शरद पवारांना भेटायला जाणार नाहीत असेही उमेश पाटील म्हणाले. या चुकीच्या बातम्या आहेत. विलीनीकरणाची चर्चा आगामी काळात होईल का नाही हे माहीत नाही परंतू, आता सध्या चर्चा सुरु नाही असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!