Uncategorized

ऐन दिवाळीच्या आनंदोत्सवात बालविवाहाला लगाम…. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश….

Gondia shadhna news

ऐन दिवाळीच्या आनंदोत्सवात बालविवाहाला लगाम…
प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश…

( गोंदिया ) दिनांक 10/11/2026 रोजी सिटी पोलीस स्टेशन गोंदिया हद्दीतील प्रगती कालोनी छोटा गोंदिया येथे बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच. जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे यांचे मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्ष , दामिनी पथक, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया, चाइल्ड हेल्पलाइन, यांची टीम तयार करून प्राप्त माहितीनुसार होऊ घातलेल्या विवाहातील बालक आणि बालिकेचे जन्म प्रमाणपत्र अंगणवाडी कडून प्राप्त करून घेण्यात आले. सदर प्रमाणपत्रा नुसार बालिकेचे वय ( 17 वर्षे 7 महिने 20 दिवस) बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार पूर्ण नसल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने संपूर्ण टीम होऊ घातलेले विवाह स्थळ गोंदिया येथे दुपारी 2.30 वाजता पोहोचले. सायंकाळी 5.30 वाजता होणाऱ्या विवाहाची संपूर्ण तयारी झालेली होती. काही वेळानंतर लग्न कार्याला सुरू होणार होते. त्यावेळी दामिनी पथकातील पोलिसांसह महिला बाल विकास विभाग व इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी च्या टीमने नवरदेव, नवरी त्यांच्या आई वडील आणि नातेवाईक यांना ताब्यात घेऊन सदर होऊ घातलेल्या विवाहातील बालिकेचे वय कमी असून बालविवाह प्रतिबंधक 2006 च्या कायद्यानुसार वय पूर्ण नसल्याने गुन्ह्यास पात्र आहे. बालविवाहमुळे होणारे दुष्परिणाम बालकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगण्यात आले. वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे कायदेशीर हमीपत्र बालकांच्या आई-वडिलांकडून आणि नातेवाईकांकडून लिहून घेण्यात आले. बालविवाह मुक्त भारत, बालविवाह मुक्त महाराष्ट्र आणि गोंदिया जिल्हा या महत्त्वकांक्षी अभियानाची मोहीम सुरू असून बालविवाह मुक्त गोंदिया करण्यासाठी आपला संकल्प अभियान सुरू आहे. याप्रसंगी जमलेल्या सर्व लोकांना अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास अंगणवाडी सेविका, जवळचे पोलीस स्टेशन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी, चाइल्ड हेल्पलाइन च्या टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावे असे सांगण्यात आले.
सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे माध्यम नसून, आपुलकीची नाती अधिक दृढ करण्याचे आणि स्नेहबंध जपण्याचे सुंदर पर्व असते.
प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाचा प्रकाश सदैव उजळत राहो, सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे नवे पर्व सुरू होवो, अशा शुभेच्छा आपण देतो. पण ह्याच शुभेच्छा एका अल्पवयीन जीवाच्या आयुष्यभराच्या समस्यांचा विळखा बनत असेल तर, म्हणून आज अशा रूढी परंपरा अनिष्ट प्रथा यांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सजग राहून कायद्याचे अंमलबजावणी केली तर निश्चितच बालविवाह सारखे प्रकार आणि त्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे व इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले यांचे नेतृत्वात संपूर्ण कार्यवाही करण्यात आली. बालिकेला पुढील कार्यवाही करिता माननीय बालकल्याण समिती गोंदिया यांच्याकडे सादर करण्यात आले. सदर होणारा बालविवाह थांबविण्याकरिता अमित बेलेकर संचालक इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी, धर्मेंद्र भेलावे जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि दामिनी पथक गोंदिया चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा निकम सहा. फौजदार राधेश्याम फुंडे, मपोशि वैशाली भांदक्कर,चामपोशि सुरेखा मेढें, चाईल्ड लाईनचे आनंद रामटेके तसेच पूजा अनकर, हर्ष चव्हाण बालविवाह थांबविण्याच्या कार्यवाहीमध्ये सहभागी होते.

GONDIA SADHNA NEWS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!